Tuesday, June 23, 2020

आनंदघर लेख - ७ ' रोबोटिक्स असेंम्बली शिबिर (Robotics Assembly)'



आनंदघर लेख - ७ ' रोबोटिक्स असेंम्बली शिबिर (Robotics Assembly)'

 

मुलांच्या विश्वात स्मार्ट फोन, इंटरनेट, रोबोट, स्पेस, ट्रान्सफॉर्मर इत्यादी याला एक वेगळं स्थान आहे। अशी गॅजेट्स मुलांना अजिबात द्यायची नाही किंवा अतिवापर करू द्यायचा अशी दोन्ही टोकं योग्य नाहीत। याविषयीच त्यांचं कुतूहल, creativity कशी जागृत ठेवता येईल, याला खतपाणी कसं मिळेल याचा विचार व्हायला हवा। असा विचार करून  रोबोटिक्स  असेंबली  शिबिर  आयोजित  करण्यात आलं. Science, technology, creativity अशी सर्व सुंदर learning process अनुभवत होते। वेगवेगळ्या assembly बनवताना येणाऱ्या अडचणी, त्यावर मार्ग स्वतः शोधणं, गरज भासली तर ताईची मदत घेणं अशी सगळी मजा चालू होती। यादरम्यान एक छान अनुभव आला। मुलांसोबत बाहेर फिरत असताना त्यांना एक क्रेन दिसली लगेच याच design कस आहे? fulcrum point आहे की नाही? यावर चर्चा सुरू झाली। शिबिराच्या सुरुवातीला मॅन्युअल आधारे assembly केल्या मात्र शेवटच्या 2 दिवसात स्वतःच designing, modifications करून assembly केल्या।

या अनुभवविषयी सविस्तर जाणून घेऊ...

रोबोटिक्स असेंबली या शिबिराविषयी मलाही उत्सुकता होती. सहा ते बारा या वयोगटातील मुले रोबोटिक्स समजावून घेण आणि स्वतः ती तयार करणं, तशी क्लिष्ट प्रक्रिया होती. संगीता बनगीनवार, तज्ञ यांनी हे शिबिर आनंदघरी घेतलं. शिबिराच्या पहिल्या दिवशी रोबोटिक्स असेंबलीबद्दल विविध शब्दांचा, त्याच्या टूल्सचा, त्यातल्या भागांचा व्यवस्थित परिचय करून घेऊन असेंबली बनवायला सुरुवात झाली. रोबोटिक्स असेंबलीतून जेसीबी JCB, मांजर इत्यादी बनवता येतं. त्यासाठी डिझायनिंग करणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीला  डिझाइन्स बद्दल आणि पहिल्या असेंबलीबद्दल संगीताताईने मुलांना मार्गदर्शन केलं. रोबोटिक असेंबली साठी एक किट आहे, त्यात स्क्रू, नट प्लास्टिकचे काही पार्ट, मोटर असे सर्व टूल्स असतात आणि त्यातून असेम्ब्ली बनवली जाते. सुरुवातीला मॅन्युअल आधारे असेंबली केल्या. शिबिराच्या पहिल्या दिवशी F1 कार (गाडीचा प्रकार)असेंबल केला.

दुसऱ्या दिवशी टेस्टिंग केलं. टेस्टिंग म्हणजे काय? F1 कारची जी  असेंबली बनवली आहे ती बरोबर झाली की नाही, ती रिमोट वर चालते की नाही. कुठे काही राहून गेलं का? इत्यादी तपासण्या  झाल्यावर दुसरी असेंबली डंपर (गाडीचा प्रकार) करायला घेतली. शिबिराच्या तिसऱ्या दिवशी असेंब्लीच्या (mechanical concepts ) यांत्रिकी संकल्पना याविषयी बोलणं झालं. त्यात  फलक्रम पॉईंट , पेंडुलम इत्यादी समजावून घेतलं. मुलांच्या विश्वात स्मार्ट फोन, इंटरनेट, रोबोट, स्पेस, ट्रान्सफॉर्मर इत्यादी याला एक वेगळं स्थान आहे। अशी गॅजेट्स मुलांना अजिबात द्यायची नाही किंवा अतिवापर करू द्यायचा अशी दोन्ही टोकं योग्य नाहीत। याविषयीच त्यांचं कुतूहल, creativity कशी जागृत ठेवता येईल, याला खतपाणी कसं मिळेल याचा विचार व्हायला हवा. वेगवेगळ्या assembly बनवताना येणाऱ्या अडचणी, त्यावर मार्ग स्वतः शोधणं, गरज भासली तर ताईची मदत घेणं अशी सगळी मजा चालू होती। यादरम्यान एक छान अनुभव आला। मुलांसोबत बाहेर फिरत असताना त्यांना एक क्रेन दिसली लगेच याच design कस आहे? fulcrum point आहे की नाही? यावर चर्चा सुरू झाली। त्याच दिवशी काही मुलांनी शेपटी हलवणारी रोबोकॅट बनवली. शिबिराच्या चौथ्या दिवशी विद्युत संकल्पना (इलेक्ट्रिकल कन्सेप्ट) डीसी आणि एसी मोटर समजून घेतलं.

अशाप्रकारे थेअरी व प्रॅक्टिकल दोन्हींचा मेळ घालत सुरुवातीला थोडी साधी असेंबली बनवण्यात आली. मुलांना एकदा त्यातल्या मूलभूत संकल्पना लक्षात आल्यानंतर त्यांना नवनवीन सुचू लागले. त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना गगन भरारी घेऊ लागल्या आणि शिबिराचे पुढचे सर्व दिवस स्वतःच्या कल्पना (इमॅजिनेशन) प्रत्यक्षात उतरवण सुरू झालं. क्रिएटिव्हिटी यापेक्षा वेगळी काय असते? या सर्व प्रक्रियेमध्ये मुलं खुलली, बहरली. संगीताताईने सुंदर पद्धतीने मुलांना अवकाश देत हे शिबिर घेतलं. कमीतकमी सूचना जास्तीत जास्त इमॅजिनेशन कुठल्याही शिबिराची आणि उपक्रमांची प्रक्रिया बघणं जास्त मजेदार असतं. शिबिरानंतरही मुलांनी स्वतःच्या डिझाईन आणि असेंबली बनवणे सुरू ठेवलं. त्यात अडचणी येतात,  त्यामागची कारणं शोधून काढणं, आपल्या मनातलं सत्यात उतरवण हे भारी आहे.

उदाहरण साहिलने दोन दारं असलेलं उघडझाप करतील अशी असेंबली बनवली परंतु त्यात एकच दार उघडझाप होत होतं. त्यात नेमकं काय अडचण येत होती? यावर बराच वेळ लागला. ती दुरुस्त करून मनासारखी असेंबली झाल्यावरच तो थांबला. तोपर्यंत त्यांन खाणं-पिणं थांबवलं. सांगायचा मुद्दा हा की मुलं त्यात गुंतून जातात. त्यांचे विचार चक्र फुल स्पीडने कार्यरत असत. त्यावेळी त्यांना इतर काहीही नको असतं. ही प्रक्रिया /अनुभव सुंदर आहे.

  

अँड. छाया गोलटगावकर

chhaya.golatgaonkar@gmail.com


No comments:

Post a Comment