आनंदघर लेख - १० ' आनंदघर:
वैविध्यपूर्ण उपक्रम: भाग- १'
आनंदघरच्या सुरुवातीपासून 2 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी विविध उपक्रमांचं नियोजन केलं गेलं. मुलांच्या वाढीचे व विकासाचे टप्पे लक्षात घेऊन उपक्रमांची आखणी करण्यात आली. आनंदघरच्या (दैनंदिन) रोजच्या वेळापत्रकात चित्र काढणं, रंगांशी खेळणं, कातरकाम, कागदाच्या विविध वस्तू बनवणं, कचऱ्यातून, टाकाऊ वस्तुपासून सुंदर कलाकृती बनवणं. विविध धाग्यांचा वापर करणं, अनेक प्रकारचे खेळ खेळणं(Indoor-Outdoor), गोष्टी, गाणी, गप्पा असं भरपूर काही चालू असतं.
भारतात सण-उत्सव भरपूर आहेत. भौगोलिक परिस्थिती, सांस्कृतिक, आर्थिक, ऐतिहासिक, पार्श्वभूमी वैविध्यपूर्ण आहे. विविध भागात सण- उत्सव साजरे केले जातात. ते सण साजरे करण्याच्या त्या-त्या भागातल्या पद्धती आहेत. महाराष्ट्रातही अनेक प्रकारे सण-उत्सव साजरे होतात. घराघरात आनंदोत्सव सुरू असतो. परिसरातल्या या गोष्टी मुलांच्या विश्वाचा भाग असतात. याचं महत्त्व लक्षात घेऊन आनंदघरातही विविध सण- उत्सव साजरे केले जातात. मात्र हे सण- उत्सव साजरे करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. यात धार्मिकता, टोकाची भूमिका न घेता, माणसाचं जोडलेपण कसं टिकून राहील, ते कसं वृद्धिंगत होईल यावर भर दिला जातो. अश्याप्रकारे सर्व सण- उत्सवाचं re- interpretation करून उपक्रम राबविण्यात येतात.
मिळेल यावर कायम लक्ष असतं व त्यावर आखणी केली जाते.
म्हणजे एखादी विशिष्ट गोष्ट याच प्रकारे करायची आहे याची सक्ती मुलांवरही केली जात
नाही व ताई मावशींवरही केली जात नाही. नवनवे प्रयोग करायला कायम वाव दिला जातो. धर्म,
श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे, सार्वजनिक नाही; त्यामुळे ती वैयक्तिक पातळीवर
जोपासली जावी, सार्वजनिक ठिकाणी नाही. यानुसार आनंदघरमध्ये सण- उत्सव कसे साजरे केले
जातात. त्यामुळे यविषयीचं म्हणणं मांडणं आवश्यक
ठरतं. आज जे काही समजलं आहे त्यानुसार ही मांडणी आहे, उद्या जर नवीन वेगळं काही समजलं
तर त्यात निश्चितच बदल केले जातील. त्यामुळे हे सर्व प्रयोग बांधून ठेवलेले नाहीत,
त्यात बदलांना, परिवर्तनाला खूप वाव आहे. हे सर्व विचार मुलांना समजतील अशा पद्धतीने
साधे सोपे करून सांगितले जातात.
वटपौर्णिमेला
वडाच्या झाडाची पूजा, दोरा बांधणं इ. मुलं बघतात. मुलांना प्रश्नही पडतात. पालक या प्रश्नांची उत्तरेही देतात. या उत्तराने
मुलांचं कुतूहल क्षमतं का? काही वेळा क्षमतं काही वेळा नाही. कित्येकदा मुलांचे प्रश्न
तसेच मनात घोळत राहतात. काही वेळा तर असं घडतं की मुलं प्रश्न विचारणं बंद करतं. हे
मुलाच्या विकासाच्या व वाढीच्या दृष्टीने अडथळा आहे. मुलांना प्रश्न पडले पाहिजेत व
त्या प्रश्नांचं समाधानही (उत्तरही) शोधता आलं पाहिजे. आनंदघरी वटपौर्णिमेचाही उपक्रम
होतो. खरं तर निसर्ग या विषयावर मुलांशी संवाद साधण्याची एक एक संधी मानून हा उपक्रम
घेतला जातो. त्यात वडाच्या झाडाचे चित्र किंवा छोट्या काठ्या जमवून, त्याला पानं लावून,
त्याला खरं झाड बनवणं व त्या निमित्ताने गप्पा सुरू होतात.
पहिला
प्रश्न, वडाच्या झाडाची पूजा का करतात?
काही
मुलं सांगतात, "आईला आवडतं, देव आहे... इत्यादी". आनंदघरची ताई वडाच्या झाडाची गोष्ट सांगत, सांगत पुढे गप्पा रंगतात.
वड केवढं मोठं झाड, किती वर्षे लागतात त्याला मोठं व्हायला, वड आपल्याला काय काय देतो
अशा गप्पा रंगतात. हा निसर्गामध्ये किती महत्त्वाचा आहे याविषयी बोलण होतं. सर्वात
जुनं, मोठं झाड म्हणजे वडाच झाड. मग हे झाड आपल्याला काय काय देतं. सावली, लाकूड इत्यादी.
जर आपल्याला इतकं काय काय देतं तर मग आपण झाडाला जपायला हवं की नको? मुलं एका सुरात
होssss म्हणतात. मुळात झाडाचं रक्षण व्हावं म्हणून पूर्वी कधीतरी झाडाची पूजा करत असावे.
कारण याच झाडांमुळे पाऊस पडतो. त्याची पूजा करण म्हणजे त्याला तोडायचं नाही. ही झाडं
निसर्गाचा भाग आहे.
विविध सण उत्सव निसर्गानुसार आहेत. त्या त्या सण -उत्सवाचा आहारही आजूबाजूच्या वातावरणानुसार असतो.
आषाढी
एकादशी, यावेळी मुलं वारकऱ्यांना बघत-ऐकत असतात. उपक्रमात पालखी बनविण्याची मजा, वारकऱ्यांच्या
सारखे कपडे घालणं, टाळ वाजवणं, अभंग म्हणणं उपवासाचे चविष्ट पदार्थ खाणं हे सगळं काही
असतं. आषाढी एकादशीला एक वेगळे महत्त्व आहे यानिमित्त लाखो लोक घराबाहेर पडतात. थोडा
पाऊस, थोडी हिरवळ आणि मजल दर मजल करत पंढरपुरात पोहोचतात. पंढरपुरात पोहोचण्यापेक्षा
तेथे पोहोचण्याचा प्रवास लाखो लोकांना आनंददायी, समृद्ध करणारा असतो. त्यावेळी शेतीची
कामंही फारशी नसतात. एक प्रकारे आषाढी एकादशी निसर्गाशी जोडलेली आहे.
गुरुपौर्णिमा-
जिथून कुठून आपलं शिकणं होतं, ज्या व्यक्तीकडून आपलं शिकणं होतं, त्यांचे आभार मानणं.
मग त्या व्यक्ती असतील, निसर्ग असेल, पुस्तकं सर्वांविषयी आभार मानण्याचा तो दिवस.
यात काही उपक्रम नसतोच गप्पागोष्टीचं होतात.
नागपंचमी,
नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन या सणांसाठी विविध उपक्रम आहेत. नागाचे चित्र काढणं, कागदाचा
नाग बनवणं, राख्या बनवणं. या दिवसाचे खाऊ सुद्धा वैविध्यपूर्ण असतात. नागपंचमीला उकडलेले
अन्न, नारळी पौर्णिमेला नारळी भात, रक्षाबंधनासाठी काही गोडधोड केलं जातं. भौगोलिक
स्थिती व हवामान यानुसार असा आहार ठरवला गेला असावा. नागपंचमीला नागाची पूजा याचा अर्थ
असा आहे की नागांचं संरक्षण व नागाचे आभार मानणं. कारण नाग, साप हे शेतकरीमित्र आहेत.
निसर्गाचा महत्त्वाचा भाग आहे. नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्राची पूजा पुन्हा निसर्गाचीच
पूजा, निसर्गाचे आभार याविषयी उपक्रमाबरोबरच गाणी, गप्पा, गोष्टी इत्यादी होतं. रक्षाबंधन
साजरा करताना सुद्धा राख्या बनवणे व त्या सर्वांनी एकमेकांना बांधणं. यामध्ये बहिणीनं
भावाला, भावाने बहिणीला राखी बांधणं, राखी बनवताना, होते ती मस्ती, मजा, धमाल आणि काही
गोडधोड खाणं. दहीहंडी हीसुद्धा धमालच आहे. यात दहीहंडी आणणं, ती रंगवणं, तिची सजावट
करणं, त्यानंतर ती एका उंचीवर बांधून सर्वजण आळीपाळीनं ती फोडण्याचा प्रयत्न करतात.
ती दहीहंडी फुटली पाहिजे असा काही आग्रह नाही. खाऊ सुद्धा चुरमुर्यांचा किंवा इतर कुठलाही जो मुलांच्या आवडीचा आहे, तो बनवला
जातो. मुलं हे सगळं परिसरात बघत असतात. पोळ्याच्या सणाच्या वेळी मातीचे बैल-गाय बनवणं, त्यांना रंगवणं, शेती- शेतकरी याविषयी गप्पा
गोष्टी गाणी आणि पुरणपोळीचा खाऊ चट्टामट्टा
करणं. या सणातही निसर्गाचा आदर आहे.
पाळीव
प्राणी, गाय-बैल, शेती शेतकरी या सगळ्यांविषयी आदर, आभार आहे. असं सगळ्यांविषयी मुलांशी
बोललं जातं.
गणपती मुलांच्या अगदी जिव्हाळ्याचा वर्ग. मातीचा गणपती बनवायला मुलांना आवडतं, त्याला रंगवणं, सजवणं, त्यासाठी लाडू मोदक बनवणं त्यात मुलं छान रमतात. त्यातला एक किस्सा आहे. एका वर्षी मुलांनी गणपतीचे वाहन उंदीर न बनवता पाल बनवली असा आमचा हा चौकटीबाहेरचा गणपती आहे. नवरात्रात दांडिया खेळायला मजा येते. हातात छोट्या-छोट्या टिपऱ्या घेऊन गोलात मुलं टिपऱ्या खेळतात. यात कुठेही पूजापाठ, प्रसाद या गोष्टी नसतात. दसऱ्याच्या दिवशी आनंदघरच्या दारासाठी फुलांचे हार करणं, ते हार बनवताना फुलांशी खेळणं, दोराचा वापर आणि छानसा आवडीचा खाऊ खाणं. गणपती किंवा नवरात्राच्या वेळी एका पसरट भांड्यात गहू पेरतो आणि त्याला रोज पाणी घालून तो कसा व किती वाढतो हा ही मजेचा विषय आहे. कोजागिरी पौर्णिमेला मुलांसोबत पालकही असतात. मुलांना समजतील अशी भोंडल्याची गाणी म्हणणं, दूध आटवणं, ते पिणं आणि आनंदघरच्या ताई, मावशी पालक एकत्र येऊन एकमेकांशी नातं दृढ करण्याचा हा उत्सव असतो. पालक आल्यामुळे मुलं जाम खुश असतात. आपल्याला आई-बाबांना आनंदघरातल्या गोष्टी दाखवणं, आपल्या मित्रांशी ओळख करून देणं अशी मजा चालू असते.
हे सर्व का करायचं जाणून घेऊ या लेखातील पुढच्या भागात...
क्रमशः
अँड.
छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment