आनंदघर लेख - २० ' आनंदघर
- वर्धापनदिनानिमित्त...'
आनंदघर
बालसंगोपन केंद्र, लर्निंग अँड रिसर्च सेंटर सुरु होऊन नुकतीच ४ वर्षे पूर्ण झालीत.
काही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून हा प्रवास सुरू झाला. या ४ वर्षांच्या कामातून ही
उद्दिष्टे अधिकाधिक स्पष्ट होत गेलं.
आनंदघरची उद्दिष्टे--
१)
गुणवत्तापूर्ण बालसंगोपन - कुठल्याही जाती, धर्म, लिंग, पंथ, प्रांत, भाषा, देशातील
मुलांना गुणवत्तापूर्ण बालसंगोपनाचा हक्क आहे.
२)
कुटुंबासाठी समाजासाठी एक सशक्त सपोर्टिंग सिस्टीम -
मुलांसोबत
काम करताना मुलांच्या संपर्कात येणारे पालक, शिक्षक, मदतनीस व इतर घटक यांच्यासाठी
ही प्रशिक्षणाद्वारे एक सशक्त सपोर्टिंग सिस्टम उभी करणं, सामाजिक पालकत्व स्वीकारण,
या गोष्टी अंतर्भूत आहेत.
३)
भावनिक स्थिरता-
हे काही आधीपासून ठरवलेलं उद्दिष्ट नाही. प्रत्यक्ष
काम करताना गवसलेला हा अत्यंत महत्त्वपूर्ण धागा आहे. मूल भावनिकदृष्ट्या स्थिर नसेल
तर त्यांच्या शिक्षणातही अडथळे येतात.
४) मुलांच्या वाढीचे व विकासाचे टप्पे लक्षात घेऊन काम केलं जातं.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आनंदघरी काय काय केलं जातं?
प्रत्येक मूल वेगळं असतं हे आधारभूत मानून प्रत्येक मुलाचा वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांच्या वयोगटानुसार त्यांचं वेळापत्रक बनवलं जातं. यात प्रामुख्याने गप्पा, गाणी, गोष्टी, वाळू, माती, पाणी, (इनडोअर गेम्स आउटडोअर गेम्स), झोके, घसरगुंडी, मुक्तखेळ, विविध खेळ, चित्र, नाच, बाहुलीघर, आहार, मुलांशी संवाद या कृतींना अनन्य साधारण महत्व दिलं जातं. यात मुलांना भरपूर मोकळीक मिळेल, मुलं मुक्तपणे बागडतील, असं बघितलं जातं. कारण यातूनच त्याची सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी), कल्पकता (इमॅजिनेशन), उत्तम संवादक असे गुण वृद्धिंगत होणार आहेत.
याशिवाय
आजूबाजूच्या परिसरात जे जे घडतं ते आनंदघरी घडतं. वर्षभरातले विविध सण -उत्सव साजरे
केले जातात. बदलत्या काळानुसार मुलांना समजेल अशा भाषेत त्यांच्या वयोगटानुसार याविषयीची
माहिती दिली जाते.
उदा. वडाची, नागाची, समुद्राची पूजा -उत्सव हा का केला जातो एक तर तो निसर्ग आहे, आपल्या जगण्याचा भाग आहे, त्याचं जतन करणं, त्याचे आभार मानणं अशा सर्व गोष्टी सांगितल्या जातात. सण-उत्सव प्रमाणेच विविध विषयांवर शिबिरं घेतली जातात. काही शिबिरांमध्ये तज्ञ व्यक्ती मार्गदर्शक म्हणून आमंत्रित केली जातात. आत्तापर्यंत आनंदघरमध्ये १७-१८ शिबिरातून जवळपास 300 मुलं येऊन गेली. पालक शिक्षकांसाठीही चित्र कार्यशाळा आयोजित केल्या.
दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. मुलांना तज्ञ व्यक्तींचा सहवास मिळणं. आणि मुलांनी वेगवेगळ्या गोष्टी करून बघणं. या दोन्ही गोष्टी त्यांच्या वाढीस व विकासास पोषक आहेत.
याव्यतिरिक्त वर्धापनदिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ मंडळी आनंदघरात येऊन पालक-शिक्षक, मदतनीस सर्वांशी संवाद साधतात.
बालसंगोपन, बालहक्क, बालशिक्षण या विषयांवर मांडणी करण्यासाठी व्याख्यानासाठी, प्रशिक्षणासाठी आनंदघरला आमंत्रित केलं जातं.
आत्तापर्यंत--
१)
बी.जी.व्ही.एस (नीरा-बारामती) गटातर्फे बालकहक्क या विषयावर मांडणी करण्यासाठी आमंत्रित
केलं होतं.
२)
पालक नीती या पालकत्व लावलेल्या मासिकात पाळणाघर विशेषांक बनविण्यात सहभाग व त्यात
लेखही लिहिले.
३)
आनंदघरसारखं काम आनंदवनामध्ये (वरोरा) करता येईल का? कसं करता येईल? यावर निरीक्षण,
चर्चा, मंथन भरपूर झालं यावर आधारित एक अहवाल आनंदवनात सादर केला.
४)
पुण्यातील खेळघरात बालगुन्हेगारी व समाज या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केलं होतं.
५)
आनंदघरच काम बघून फिनलंड (CCE, Finland) या युरोपीय देशात (जो कि शिक्षणात जगात नंबर
एक वर आहे) तिथे आमंत्रित करण्यात आलं. आनंदघरमध्ये चाललेल्या कामाविषयीची मांडणी,
प्रेझेन्टेशन केलं. तिथल्याही शिक्षणपद्धती विषयी तसेच इतर देशातील बालसंगोपन विषयी
जाणून घेता आलं.
६)
संध्या पन्हाळकर'ज ABC ज्ञानदा प्री- स्कूल मध्ये वर्षभराचे शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम
घेत आहे.
७) सेंट जॉन प्री- स्कूल अँड हायस्कूल, पुलगाव (वर्धा) येथेसुद्धा पालक-शिक्षक प्रशिक्षणासाठी आमंत्रित केलं गेलं.
आनंदघरची
यापुढची वाटचाल--
१)
सार्वत्रिकीकरण - आनंदघरच्या कामाचं सार्वत्रिकीकरण होणं अत्यावश्यक वाटतं. त्याद्वारे
जास्तीत जास्त मुलांपर्यंत गुणवत्तापूर्ण बालसंगोपन पोहोचेल.
२)
या कामात समाजाने व शासनाने पुढाकार घेऊन किमान जागेचा प्रश्न व आर्थिक प्रश्न सोडवावेत.
३) पालक-शिक्षक, मदतनीस यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्रे उभारणं.
आनंदघरचं
व्यवस्थापन एका निश्चित पठडीत आहे असं म्हणता येणार नाही. परंतु अगदी ढिसाळ आहे, असंही
नाही. "नॉट टू मच रिजिड नॉट टू मच फ्लेक्झिबल."
ठराविक उतरंड नाही. सोयीसाठी म्हणून ताई, शिक्षक, मदतनीस, समन्वयक इत्यादी आहेत. परंतु यातल्या कुणालाही एकमेकांचं काम करता येणं हा या व्यवस्थेचा भाग आहे. ताई, मदतनीस यांच्या ही अडचणी, त्रास समजून घेऊन त्यावर काम केलं जातं. कारण मुलांसोबत काम करणारे आनंदी असतील, तर ते उत्तम प्रकारे काम करू शकतील.
आनंदघरमध्ये सर्वांनाच सातत्यपूर्ण प्रशिक्षण दिलं जातं त्यांचे बालसंगोपनचे कोर्सेस झालेले असले तरी.
पालकांशी संवाद-- पालकत्वाच्या या प्रवासात आम्ही पालकांच्या सोबत आहोत. पालकांवर शिक्के मारण्यापेक्षा संवादी भूमिका घेतली जाते. याशिवाय पालकांसाठीचाही आधार म्हणून आनंदघर कार्यरत आहे.
आनंदघर
बालसंगोपन केंद्रात वेगळेपणाने काम करण्याचा अट्टहास कशासाठी?
यामागे
असा उद्देश आहे की बालसंगोपनाबाबत जागृती निर्माण व समाज मन बदलणं, या विषयी समाजाची
भूमिका बदलणं, वेगाने बदलत्या काळानुसार बालसंगोपन व बाल शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन
बदलणं. सद्यस्थितीत काय चालू आहे? काय असायला नको व काय घडायला हवं? याचं उदाहरण समाजासमोर
ठेवणं. शिक्षणाविषयी शासनाच्या योजना व कायद्यातील तरतूदी अशी अनेकानेक ध्येय, स्वप्न
उराशी बाळगून आनंदघरची वाटचाल सुरु आहे.
आनंदघर
ही एक पणती अनेक पणत्यांना प्रकाश देईल असा विश्वास वाटतो.....
अँड.
छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment